Top News

चिंतामणी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स बल्लारपूर यांच्या अंतर्गत स्थानिक चिंतामणी महाविद्यालय, चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स, चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभूर्णा यांच्या संयुक्तिक उपक्रमातून मास्क, सॅनिटायझरच वाटप.

चिंतामणी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स चे सचिव श्री स्वप्नील दोंतुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मिळुन केला उपक्रम यशस्वी.
Bhairav Diwase.   May 28, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पाेंभुर्णा:- काेराेना विषाणू ने जगाला हादरवून साेडलेला आहे. भारतातही काेराेना ग्रस्तांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. राज्यातही कोरोना विषाणू ने कहर घातलेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले, त्यासाठी प्रशासनाकडून याेग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून, त्याचे पडसाद भारतातही दिसू लागले, महाराष्ट्रात सुद्धा कोरोना चे रुग्ण आढळले, या कोरोना वर मात करण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर करून, शासनस्तरावर अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. सध्या कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सार्वत्रिक स्तरावर सर्वांच्या सहकार्याने एक विश्वयुद्धा प्रमाणे लढा देत आहे. देशातील प्रत्येक सामाजीक, आर्थीक, राजकीय, स्तरावरुन मदतीचा ओघ सुरु झाला. प्रत्येक संघठना, संस्था, व्यक्ती या लढाईत आप-आपला योगदान  देत आहे.
           चिंतामणी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स बल्लारपूर यांच्या अंतर्गत स्थानिक चिंतामणी महाविद्यालय, चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स व चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभूर्णा यांच्या संयुक्तिक उपक्रमातून करोना विषाणूच्या संसर्गातून होणाऱ्या कोविड - १९ च्या रोगथामासाठी पोंभूर्णा शहरात नगरपंचायत, पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, व अंतर्गत विविध विभाग, गावातील प्रवेश भागातील पोलीस नाके आणि सभोवतालच्या रा. से. यो. दत्तक ग्राम सोनापूर, चेकआष्टा आणि आष्टा ग्रामपंचायत या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मास्क व सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले.        या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चिंतामणी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स चे सचिव श्री स्वप्नील दोंतुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी गावातील परिसरात शासनाकडून मिळालेल्या संपूर्ण नियमांचे आणि सोशल डिस्टेन्सिंगचे काटेकोर आणि तंतोतंत पालन करून  लोकांना कोरोना विषाणू संदर्भात जागृती व प्रतिबंधक माहीती सांगून लोकांना मास्क, सॅनिटायझर वितरीत केले. महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले व हा उपक्रम यशस्वी केला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने